Header Ads

पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्या 5 व्यक्तींवर गुन्हा दाखल
 आंबी: कोविड- 19 च्या अनुशंगाने अंमलात असलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द पो.ठा. आंबी चे सपोनि- श्री. गोरक्ष पालवे हे पथकासह दि. 09.07.2020 रोजी 10.30 वा. सु. पोलीस ठाणे हद्दीतील मौजे अनाळा, ता. परंडा येथे कारवाई करत होते. यावेळी कमलेश मोतीलाल गदीया यांच्या दुकाना समोर ग्राहक व त्यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सदर वाहने रस्यावर न लावण्यास व ग्राहकांची गर्दी न होउ देण्याबाबत गोरक्ष पालवे यांनी त्यांस सुचवले. यावर चिडुन जाउन कमलेश गदीया याने पोलीस पथकास उध्दटपणाची भाषा वापरुन धक्काबुक्की केली. तसेच घटनास्थळावरुन परत जाणारे पोलीस वाहन आनाळा चौकात नितीन गदीया, मोतीलाल गदीया, मच्छिंद्र कदम, नितीन शिंदे अशा चौघांनी अडवून आरडा- ओरड करुन लोकांना पोलीसांविरुध्द प्रक्षोभीत केले. तसेच त्या चौघांनी पोलीसांना शिवीगाळ करुन, धक्काबुक्की करुन केली. तर मोतीलाल गदीया याने पोलीस वाहनावर दगड फेकून मारुन वाहनाचे नुकसान केले. अशा प्रकारे पोलीसांच्या शासकी कर्तव्यात नमूद पाच आरोपींनी जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला आहे.
            यावरुन पो.ठा. आंबी चे सपोनि- श्री गोरक्ष पालवे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद पाच आरोपींविरुध्द भा.दं.सं. कलम- 353, 323, 341, 143, 504, 506, 109 अन्वये गुन्हा दि. 09.07.2020 रोजी नोंदवला आहे.


No comments