Header Ads

सुजितसिंह ठाकूर मागच्या दाराने झालेले आमदार - राहूल मोटेपरंडा - भाजपचे राज्य  सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा माजी आमदार राहूल मोटे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आज काल लायकी नसताना शरद पवार साहेबांवर टीका करण्याची फॅशन झाली आहे, असे जोरदार  प्रतिउत्तर मोटे यांनी दिले आहे.

आ. सुजितसिंह ठाकूर यांनी कधीही लोकांमध्ये कोणतेही निवडणूक लढवलेली नाही, मागच्या  दाराने आमदार झाले आहेत. केंद्रात आणि राज्यात पाच वर्षे भाजपची सत्ता असताना ते जिल्ह्यात पक्षवाढीसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, दोन नगरसेवक आणि एक जिल्हा परिषद  सदस्य सोडले तर भाजपचे कसलेही अस्तित्व नाही. त्यांनी पवार साहेबांवर टीका करण्याऐवजी स्वतःच्या पक्षवाढीकडे लक्ष द्यावे, असेही मोटे यांनी सूचित केले आहे.

पाहा काय म्हणाले, राहुल मोटे 

No comments