मनाई आदेश झुगारुन विनापरवाना जिल्हा प्रवेश, पोलीस पाटलातर्फे गुन्हा दाखल लोहारा: कोविड- 19 संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्याती सर्व सिमा विनापरवाना प्रवासास बंद आहेत. असे असतांनाही 1)जहिरोद्दीन ईस्माईल शेख 2)नाजीया जहिरोद्दीन शेख, दोघे रा. बैगनवाडी, मुंबई हे दोघे दि. 18.07.2020 रोजी विनापरवाना मौजे एकोंडी, ता. लोहारा या गावात आले. अशा प्रकारे नमूद दोघांनी कोविड- 19 संसर्ग होण्याची शक्यता निर्माण करण्याची निष्काळजीपणाची कृती केली आहे.


यावरुन पोलीस पाटील- भाउसाहेब पाटील यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द पो.ठा. लोहारा येथे गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य प्रतिबंधक कारवाया.
 परंडा: विरेंद्र पृथ्वीराज पटील, रा. माणकेश्वर, ता. भुम हा दि. 18.07.2020 रोजी मौजे माणकेश्वर शिवारातील एका झाडाखाली दारुचा विनापरवाना विक्री व्यवसाय करत असतांना पो.ठा. परंडा च्या पथकास आढळला. पोलीसांची चाहुल लागताच तो घटनास्थळावरुन पळून गेला. पोलीसांनी घटनास्थळावरुन 180 मि.ली. देशी दारुच्या 24 बाटल्या (किं.अं. 1,440/-रु.) जप्त केल्या आहेत.

 लोहारा: बालाजी कुंडलीक कांबहे, रा. कानेगांव, ता. लोहारा हा दि. 18.07.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर दारुचा विनापरवाना विक्री व्यवसाय करत असतांना पो.ठा. लोहारा च्या पथकास आढळला. पोलीसांची चाहुल लागताच तो घटनास्थळावरुन पळून गेला. पोलीसांनी घटनास्थळावरुन 180 मि.ली. देशी दारुच्या 12 बाटल्या (किं.अं. 840/-रु.) जप्त केल्या आहेत.
       यावरुन नमूद दोघांविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.जुगार प्रतिबंधक कारवाई

उमरगा: 1)दत्तात्रय यशवंते 2)योगेश चिंचोळीकर 3)मोसीम बागवान 4)नामदेव पालमपल्ली 5)गणेश बेळंबे 6)जावेद शेख 7)संतोष सांगवे, सर्व रा. उमरगा हे सर्व दि. 18.07.2020 रोजी डिग्गी रोड, उमरगा येथील मोसीन बागवान याच्या शेड जवळ तिरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 5,050/-रु. सह पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळले. यावरुन नमूद सातही आरोपींविरुध्द पो.ठा. उमरगा येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments