मुरुम - पिक खाणाऱ्या वासराचे दोन्ही पाय मोडणाऱ्यावर गुन्हा दाखल
पोलीस ठाणे, मुरुम: नबीलाल मुस्तफा मुल्ला, रा. भुसणी, ता. उमरगा यांच्या शेतात दि. 24.07.2020 रोजी 18.00 वा. सु. गावातील वासरु जाउन ज्वारी व उडिद पिक खाल्याने नबीलाल मुल्ला यांनी त्या वासरास दगडाने मारहाण करुन त्याचे पाठीमागील दोन्ही पाय मोडले. अशा प्रकारे त्यांनी प्राण्यास विकलांग करुन क्रुरपणाची वागणूक दिली. अशा मजकुराच्या पोलीस पाटील- गुलाब सुभाष हिरमुखे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नबीलाल मुल्ला विरुध्द भा.दं.सं. कलम- 429 सह प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध कायदा कलम- 11 अन्वये गुन्हा दि. 25.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments