उस्मानाबाद जिल्ह्यात 3 रस्ते अपघातात 3 व्यक्ती मयतपोलीस ठाणे, नळदुर्ग: राहुल तारु चव्हाण, वय 24 वर्षे, व अर्जुन देविदास चव्हाण, दोघे रा. इंदिरानगर तांडा, हंगरगा (नळ), ता. तुळजापूर हे दोघे दि. 23.07.2020 रोजी 19.30 वा. सु. नळदुर्ग- हंगरगा (नळ) मो.सा. क्र. एम.एच. 15 इएम 2176 ने प्रवास करत होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर, मुर्टा फाटा येथे अमर अर्जुन काळेल रा. आसले, ता. वाई, जि. सातारा याने ट्रक क्र. टी.एस. 12 युए 4715 हा निष्काळजीपणे चालवून राहुल चव्हाण चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला धडक दिली. या अपघातात राहुल चव्हाण हे मयत झाले तर अर्जुन चव्हाण हे गंभीर जखमी झाले. जखमीस वैद्यकीय उपचाराची तजबीज न करता, अपघाताची खबर पोलीसांना न देता नमूद ट्रक चालक घटनास्थळावरुन निघून गेला. अशा मजकुराच्या अमोल तारु चव्हाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद ट्रक चालकाविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


पोलीस ठाणे, आनंदनगर: मुकूंद नामदेव काकडे व सुनिता बालाजी मुळे, वय 45 वर्षे, दोघे रा. सांजा, ता. उस्मानाबाद हे दोघे दि. 20.04.2020 रोजी 16.15 वा. सु. सांजा रोडवरील गोरोबाकाका मंदीरा जवळील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 2827 ने प्रवास करत होते. यावेळी मुकूंद काकडे यांनी मो.सा. निष्काळजीपणे चालवल्याने अनियंत्रीत होउन रस्त्यावरील खड्ड्यात आदळली. यात पाठीमागे बसलेल्या सुनिता मुळे खाली पडून त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाल्या. जखमीस वैद्यकीय उपचाराची तजबीज न करता, अपघाताची खबर पोलीसांना न देता मुकूंद काकडे घटनास्थळावरुन निघून गेले. अशा मजकुराच्या बिरुदेव बालाजी मुळे (मयताचा मुलगा) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुकूंद काकडे यांच्या विरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


पोलीस ठाणे, ढोकी: ज्ञानेश्वर रंगनाथ कदम, वय 22 वर्षे, रा. तडवळा (क.), ता. उस्मानाबाद हे दि. 24.07.2020 रोजी रात्री 09.00 वा. सु. लातुर- बार्शी रस्त्याने पायी चालत जात होते. दरम्यान गणपती मंदीरा जवळ लातुर कडून बार्शी कडे जाणाऱ्या मिनी ट्रक क्र. एम.एच. 04 जेयु 2151 ने त्यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यु झाला. अपघातानंतर अज्ञात चालक मिनी ट्रक घटनास्थळी सोडून पसार झाला. अशा मजकुराच्या दत्तात्रय काशिनाथ कदम यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चालका विरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments