उस्मानाबाद शहरातील एका वृत्तवाहिनीचा रिपोर्टर कोरोना पॉजिटीव्ह

 
कोरोनाग्रस्त रिपोर्टरमुळे जिल्हाधिकाऱ्यासह अनेकजण अडचणीत


उस्मानाबाद शहरातील एका वृत्तवाहिनीचा रिपोर्टर कोरोना पॉजिटीव्ह


उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टरचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. हा रिपोर्टर जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस हजर होता तसेच एका खासगी बँकेच्या अध्यक्षाने दिलेल्या पार्टीस हजर होता, त्यामुळे जवळपास ५० ते ६० जण अडचणीत आले आहेत.


या रिपोर्टरला चार दिवसापूर्वी ताप आला असता, त्याचा स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट आज प्राप्त झाला आहे. तो पॉजिटीव्ह आल्याने त्यास विलीगीकरण  कक्षात ठेवण्यात आले आहे.


पत्रकार परिषदेस हजर 

७ जुलै रोजी उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी हा  कोरोनाग्रस्त रिपोर्टर मॅडमच्या जवळच्या खुर्चीवर बसला होता, तसेच शहरातील अनेक पत्रकार, नेते आणि  लोकांच्या संपर्कात आला होता. विशेष काल रात्री एका खासगी बँकेच्या अध्यक्षाने दिलेल्या पार्टीस हजर होता. त्यामुळे अनेकांना क्वारंटाइन व्हावे लागणार आहे.

पत्रकारांनी क्वारंटाइन व्हावे - नगराध्यक्ष 

उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा  मुधोळ - मुंडे यांच्या ७ जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेस जे पत्रकार उपस्थित होते, त्यांनी होम क्वारंटाइन व्हावे, त्यांचा स्वाब दोन दिवसात घेतला जाईल, असे नगराध्यक्ष  मकरंद राजेनिंबाळकर यांनी कळवले आहे.


From around the web