पुढील आठवड्यात कोविड लॅब चालू होणार - पालकमंत्री गडाख


                                     
          उस्मानाबाद :-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या  उस्मानाबाद येथील उपकेंद्रात जिल्ह्यातील दानशूर संस्थांच्या सहकार्यातून कार्यान्वित होत असलेली कोरोना चाचणी प्रयोगशाळा पुढिल आठवड्यात जिल्हावशीयांच्या सेवेत सुरू होणार आहे. 

            जिल्ह्यातील सर्व बँका , पतसंस्था, नगर पालिका, साखर कारखाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या सहकार्यातून उस्मनाबाद येथील कोविड लॅबचे काम पूर्ण झाले असून पुढील आठवड्यात ही लॅब चालू होणार आहे. प्रयोगशाळेतील सर्व साहित्य पोचले आहे. त्याची जोडणी करण्याचे काम येथील अभियंते करत असून एक ते दोन दिवसात ते पूर्ण होत आहे. त्यानंतर यासाठी लागणारा प्रशिक्षित वर्ग विद्यापीठातील उपकेंद्रतूनच दिला जाणार आहे. त्यांचेही प्रशिक्षण पूर्ण होत असून पुढील आठवड्यात ही प्रयोगशाळा जिल्हावाशीयांच्या  सेवेत येत आहे. त्यामुळे जिल्ह्याची इतरत्र चाचणीसाठी होणारी धावपळ थांबणार असून त्यासाठी आता केवळ एक आठवड्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मी स्वतः ही प्रयोगशाळा तात्काळ सुरू व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी नित्यनियमाने संपर्क करीत आहे.  तसेच विद्यापीठातील  प्रयोगशाळेचे काम पाहणारे सर्व सहकारी यांच्याशी संपर्कात असून लवकरच उपकेंद्रातील ही प्रयोगशाळा कार्यान्वित होईल.
                                                    
                कोरोणाचा संसर्ग कमी करायचाय, वाढवायचा नाही....

'घरीच रहा ;कोरोनाला टाळा' असं आपण सर्वांना सांगतो, आणि हेच योग्य आहे.  जर मी दौरा केला तर अधिकारी कर्मचारी हे सर्व एकमेकांच्या संपर्कात येतात. यातून कोरोनाचा संसर्ग रोखण्याऐवजी वाढू शकतो. त्यामुळे प्रमुख अधिकाऱ्यांची झूमआप द्वारे मीटिंग घेतो.  फोनवरून संपर्क करतो. असेही नाही एखादी फाइल माझ्या सहीमुळे राहिलेली आहे. त्यामुळे दौरा केलाच पाहिजे. सर्व कामे व्यवस्थित सुरू आहेत. जिल्ह्यात कोठेही कोणाची तक्रार नाही. त्यामुळे योग्य वेळ आल्यानंतर मी प्रत्येक तालुकानिहाय दौरा करणारच आहे. 
-शंकरराव गडाख, पालकमंत्री 

No comments