कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ९ जुलै रोजी तीन तालुक्यात आठ रुग्ण वाढले
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णाची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्वाब तपासणीचा भार वाढला आहे. लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वाबची तपासणी केली जाते, परंतु दररोज फक्त १०० स्वाब पाठवण्याची अट  घालण्यात आली आहे.

९ जुलै रोजी पाठ्वण्यात आलेल्या स्वाबचा रिपोर्ट अधर्वट प्राप्त झाला आहे. उस्मानाबाद, भूम आणि उमरगा तालुक्यातील रिपोर्ट [प्राप्त  झाले आहेत, परंतु अन्य तालुक्याचे रिपोर्ट अजूनही प्राप्त झाले नाहीत. तसेच १० जुलै रोजीचे रिपोर्ट अजून पेंडिंग आहेत.

उस्मानाबाद, भूम आणि उमरगा तालुक्याचा जो रिपोर्ट प्राप्त झाला आहे त्यात आठ रुग्ण वाढले आहेत.


उस्मानाबाद -  जिल्हा शासकीय रुग्णालयातून  ९ स्वाब  तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यापैकी तीन  पॉजिटीव्ह आले आहेत.

भूम - भूम तालुक्यातील सहा स्वाब पाठवण्यात आले होते त्यापैकी चार पॉजिटीव्ह आले आहेत

उमरगा - उमरगा  तालुक्यातील १५ स्वाब पाठवण्यात आले होते, त्यापैकी एक पॉजिटीव्ह आला आहे.कोरोना संशयिताचा मृत्यू

उमरगा शहरातील कोविड उपजिल्हा रुग्णालयातून आठ व नऊ तारखेला पाठवलेल्या स्वॅबचे १५ अहवाल शुक्रवारी (दि.१०) दुपारी प्राप्त झाले. त्यात १४ जण निगेटिव्ह तर उपजिल्हा रुग्णालयातील एक महिला कर्मचारी पॉझिटिव्ह आली. औषध दुकानदार कोरोना संशयिताचा शुक्रवारी मृत्यू झाला.

कोविड उपजिल्हा रुग्णालयातून बुधवारी व गुरुवारी (दि .९) ३२ जणांचे स्वॅब प्रलंबित होते. त्यापैकी शुक्रवारी दुपारी १५ जणांचे अहवाल आले. त्यात उपजिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचारी पॉझिटिव्ह आली असून १४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तालुक्यात आता ५२ कोरोनाबाधीत झाले. शुक्रवारी सकाळी शहरातील एक मेडिकल मालक आजारी असल्याने कोविड रुग्णालयात उपचारास नेले. त्यांचा स्वॅब नमूना घेवून उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाला असून अहवाल मिळाला नसला तरी कोरोनाची लक्षणे असल्याने कोविड नियमानुसार आरोग्य कर्मचारी व पालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी अंत्यसंस्कार केले.


तुळजापुरातील हाॅटेलचालक कोरोना पाॅझिटिव्ह

 तुळजापूर शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या हाॅटेलचा चालक कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याने खळखळ उडाली आहे. त्याच्या सावरगाव येथील कुटुंबातील १२ जणांसह हाॅटेलातील पाच कामगारांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेने तातडीने हाॅटेलचा परिसर सील केला आहे.
शहराच्या नेहमी गजबजलेल्या हाॅटेलचा मालक गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्याच्यावर उस्मानाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा कोरोनाचा अहवाल गुरुवारी रात्री पाॅझिटिव्ह आला. त्यानंतर प्रशासनाने त्यांचे मूळ गाव असलेल्या तालुक्यातील सावरगाव येथून १२ कुटुंबीयांना ताब्यात घेतले. तसेच हाॅटेलातील पाच कामगारांना सुद्धा क्वारंटाइन केले.

सविस्तर बातमी लवकरच 

2 comments

Unknown said...

Stay home stay safe

ram said...

kal ratri Paranda Madhe pan 1 Positive rugn aadhlla aahe tyacha upchar barshi yethe chalu aahe ?