Header Ads

पोलीस व कोरोना वॉरीयर्स यांच्या सतर्कतेने हरवलेले बालक पालकांच्या ताब्यात


पोलीस ठाणे, उमरगा: प्रथममेश किशोर यादव, वय 3 वर्षे रा. बालाजीनगर, उमरगा हा दि. 05.07.2020 रोजी दुपारी 01.30 वा. सु. त्याच्या घरा समोर खेळत होता. खेळतांना तो वाट चूकल्याने घरा पासुन दुर गेला. तो बेपत्ता झाल्याने कुटूंबीयांनी उमरगा पोलीस ठाणे गाठले. यावर पोलीसांनी प्रथमेश याचे छायाचित्र व तो बेपत्ता झाल्याची बातमी कोरोना वॉरीयर्स यांच्या सहकार्याने स्थानिक व्हाट्सअप गटांत प्रसारीत करुन बीट मार्शल यांना त्या परिसरात गस्त करण्यास सांगीतले. पोलीस व कोरोना वॉरीयर्सच्या प्रयत्नांना यश मिळुन बालाजीनगर पाठीमागे भटकत असलेल्या प्रथमेशला त्याच्या कुटूंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. प्रथमेश सापडल्याने त्याचे कुटूंबीय भारावून जावून त्यांनी कोरोना वॉरीयर्स व पोलीसांचे आभार व्यक्त केले. मनाई आदेशांचे उल्लंघन 70 पोलीस कारवायांत 16,700/-रु. दंड वसुल.
उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष- आपत्ती निवारण प्राधिकरण यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 05.07.2020 रोजी खालील मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 61 कारवायांत- 12,200/- रु. दंड प्राप्त झाला आहे.
2)कार-मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात वाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 9 कारवायांत 4,500/- रु. दंड प्राप्त झाला आहे.

मोटार वाहन कायदा उल्लंघन: 305 कारवाया- 67,100 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.

उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा यांनी दि. 05/07/2020 रोजी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द 305 कारवाया करुन 67,100 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसूल केले आहे.

No comments