Header Ads

पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल
 लोहारा: लोहारा पो. ठा. चे पोलीस कॉन्स्टेबल- वैजिनाथ मोहिते हे दि. 23.07.2020 रोजी 11.15 वा. सु. पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कमलापुर गावास कोविड- 19 संदर्भाने भेट देउन जनजागृती करत होते. यावेळी अमर विश्वनाथ कांबळे, रा. अशीव, ता. औसा हे नाका- तोंडास मास्क मास्क न लावता फिरतांना आढळल्याने मोहिते यांनी त्यास हटकले. यावर त्याने चिडुन पोलीस कॉन्स्टेबल- मोहिते यांना शिवीगाळ करुन, धक्काबुक्की केली. अशा प्रकारे अमर कांबळे याने मनाई आदेशांचे उल्लंघन केले. तसेच मोहिते यांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला.

यावरुन पोकॉ- वैजिनाथ मोहिते यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 353, 332, 504, 269, 188 अन्वये गुन्हा दि. 23.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments