भूम : मोटारसायकलने धडक दिल्याने एक महिला जखमी भुम: आशाबाई रणजीत भगत, वय 37 वर्षे, रा. नवलगांव, ता. भुम या दि. 06.07.2020 रोजी 17.30 वा. सु. मौजे नलगांव येथील रस्त्याने पायी चालत जात होत्या. दरम्यान विलास मारुती कुदळे, रा. पाटसांगवी, ता. भुम यांनी मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 7658 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून आशाबाई भगत यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात आशाबाई यांच्या हाताचे हाड मोडले असून त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांनी वैद्यकीय उपचारानंतर दिलेल्या प्रथम खबरेवरुन विलास कुदळे यांच्याविरुध्द गुन्हा दि. 29.07.2020 रोजी नोंदवला आहे.No comments