Header Ads

चोरीस गेलेली २० हजार रक्कम पोलीसांनी केली मुळ मालकास परत
तुळजापूर:
 मैनोद्दीन बशीर शेख रा. कुंभारी, ता. तुळजापूर हे दि. 14.01.2020 रोजी 17.30 वा. सु. नविन बसस्थानक, तुळजापूर येथे बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेउन अनोळखी व्यक्तीने त्यांच्या विजारीच्या खिशातील 20,000/- रु. चोरले होते. यावरुन पो.ठा. तुळजापूर येथे गु.र.क. 18/2020 दाखल आहे. नमूद गुन्हा तपासात तुळजापूर पोलीसांनी आरोपीच्या ताब्यातून नमूद चोरीची रक्कम जप्त केली होती. ती रक्कम न्यायालयाच्या आदेशाने मैनोद्दीन बशीर शेख यांना दि. 12.06.2020 रोजी पो.नि. श्री हर्षवर्धन गवळी यांच्या हस्ते तुळजापूर पो.ठा. येथे हस्तांतरीत करण्यात आली. रक्कम परत मिळाल्यामुळे मैनोद्दीन शेख यांनी या प्रसंगी तुळजापूर पोलीसांचे आभार व्यक्त केले.

 
चोरी.
पोलीस ठाणे, आनंदनगर: वैभव मोहिते, रा. बँक कॉलनी, उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो होंडा मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्स 8887 ही दि. 11.06.2020 रोजी रात्री 10.00 वा. आपल्या घरा समोर ठेवली होती. ती अज्ञात चोरट्याने मध्यरात्री चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या त्यांच्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 13.06.2020 रोजी नोंदवला आहे.

रस्ता अपघातात एकाचा मृत्यु, चालकावर गुन्हा दाखल.
पोलीस ठाणे, लोहारा: केशव गणपती रसाळ, रा. लोहारा हे त्यांच्या पत्नी- लक्ष्मीबाई रसाळ, वय 60 वर्षे असे दोघे दि. 06.08.2019 रोजी 16.00 वा. सु. माळेगांव येथे लुना मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 1052 ने जात होते. प्रवासा दरम्यान केशव रसाळ यांनी मोटारसायकल रस्त्याच्या वळणावर निष्काळजीपणे चालवल्याने मोटारसायकल घसरली. या अपघातात लक्ष्मीबाई रसाळ या जखमी झाल्याने वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाल्या. या अपघात व मृत्युस केशव रसाळ हे जबाबदार असल्याचे  अकस्मात मृत्युच्या चौकशीत निष्पन्न झाले. यावरुन पोहेकॉ- अनिल बोदमवाड यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन केशव रसाळ यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 279, 304 (अ), सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 13.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments