Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल


पोलीस ठाणे, आनंदनगर: मनोज विकास राठोड, रा. शिंगोली तांडा, ता. उस्मानाबाद यांचे वडील- विकाय राठोड यांनी पापा मगर रा. शिंगोली यांना मोटारासायकल मागीतली होती. याचा राग मनात धरुन व पुर्वीच्या भाडणाच्या कारणावरुन मौजे शिंगोली येथील पापा मगर, पप्पु मगर, बप्पा मगर, कालीदास पडवळ यांनी दि. 10.06.2020 रोजी 14.00 वा. सु. शिंगोली तांडा येथे येउन मनोज राठोड यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. भावास मारत असल्याचे पाहुन मनोज राठोड यांची बहीण मारहाण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी मारहाण केली. अशा मजकुराच्या मनोज राठोड यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 12.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, नळदुर्ग: प्रकाश केशव बोर्डे, रा. अणदुर, ता. तुळजापूर हे दि. 12.06.2020 रोजी 12.30 वा. सु. त्यांची बहीण सुषमा मातोळे यांच्या अणदुर शेत गट क्र. 410 मध्ये पेरणीचे काम करत होते. यावेळी भाऊबंद- गुणवंत बोर्डे, विक्रम बोर्डे या दोघांनी शेतजमीनीच्या कारणावरुन प्रकाश बोर्डे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच विक्रम बोर्डे यांनी प्रकाश बोर्डे यांच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रकाश बोर्डे यांच्या फिर्यादीवरुन नमुद दोघांविरुध्द गुन्हा दि. 12.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: विठ्ठल बंडगर, राम बंडगर, अशोक यमपुरे, सिध्दु यमपुरे, शांताबाई यमपुरे, मारुती सर्व रा. हंगरगा (खु.), ता. तुळजापूर यांनी दि. 25.05.2020 रोजी 23.30 वा. सु. गावातीच- आकाश बाबु चौगुले यांच्या घरा समोर बेकायदेशीर जमाव जमवून पुर्वीच्या भाडणाच्या कारणावरुन आकाश चौगुले यांच्यासह त्यांचे भाऊबंद- सुरज चौगुले, जखन जाधव यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच मारहाण सोडवण्यास आलेल्या आकाश चौगुले यांच्या आईसही मारहाण केली. अशा मजकुराच्या आकाश चौगुले यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 12.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, तामलवाडी: विलास सुरवसे, रा. वडगाव (काटी), ता. तुळजापूर हे पत्नी- दिपाली, भाऊ- विकास यांसह दि. 12.06.2020 रोजी गावातीलच आपल्या शेतात काम करत होते. यावेळी गावातीलच- 1)सुरज पाटील 2) आण्णासाहेब पाटील 3)अजय पाटील 4)संजय म्हमाने 5)सुमीत म्हमाने 6)अमित म्हमाने या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून सामाईक बांध नांगरण्याच्या वादावरुन विलास सुरवसे यांसह त्यांची पत्नी, भाऊ यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. अशा मजकुराच्या विलास सुरवसे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 13.06.2020 रोजी नोंदवला आहे.

1 comment

AMBADAS V GORE said...

कोरोना महामारी मुळे कोठे तोंड दडवावे हे कळत नाही.
आणि या लोकांना भांडण तंटे कसे सुचत आहेत देव जाणे.
आता या महामारीला बघुन तरी लोकांनी धडा घेतला पाहिजे एवढेच.