Header Ads

गुटखा बाळगला, 3 गुन्हे दाखल


पोलीस ठाणे, आनंदनगर: ईस्माईल मुनिर शेख, रा. उस्मानपुरा, उस्मानाबाद हे दि. 10.05.2020 रोजी 21.00 वा. सु. आपल्या राहत्या घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले अन्नपदार्थ- तंबाखु व तंबाखुजन्यपदार्थाचे 10 खोकी व 102 पुड्या (एकुण किं.अं.4,730/-रु.) बाळगले असतांना पो.ठा. आनंदनगर यांच्या पथकास आढळले होते.


पोलीस ठाणे, मुरुम: अविनाश शरणाप्पा ओमशेट्टे, रा. आलुर, ता. उमरगा हे दि. 12.05.2020 रोजी 19.00 वा. सु. मौजे वरनाळवाडी येथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्नपदार्थ पानमसाला 70 पुडे व तंबाखुजन्य पदार्थ 60 पुडे (किं.अं.10,200/-रु.) विक्री करण्यासाठी मो.सा. क्र. एम.एच. 25 एपी 9848 वर अवैध वाहतुक करत असतांना पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळले होते.

तर दुसऱ्या घटनेत साधान नशिर कागदी, रा. कागदी गल्ली, मुरुम, ता. उमरगा हे दि. 14.05.2020 रोजी मौजे बेळंब शिवारात प्रतिबंधीत अन्नपदार्थ पानमसाला 36 पुडे व तंबाखुजन्य पदार्थ 36 पुडे (किं.अं. 5,400/-रु.) विक्री करण्यासाठी मो.सा. क्र. के.ए. 32 ईएस 3463 वर अवैध वाहतुक करत असतांना पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळले होते.

वरील तिन्ही प्रकरणांत जप्त अन्नपदार्थ हा प्रतिबंधीत असल्याची खात्री करुन अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रेणूका पाटील यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमुद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 272, 273 सह, अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26, 27, 30 अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

मनाई आदेश झुगारुन पानटपरी चालू ठेवली, गुन्हा दाखल.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): कोविड- 19 रोगाच्या साथीला प्रतिबंध घालण्यासाठी पुढील आदेशा पर्यंत पानटपऱ्या बंद ठेवण्याचा मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांचा आदेश आहे. असे असतानाही नासीर अहमद चाऊस, रा. शम्स चौक, उस्मानाबाद यांनी दि. 10.06.2020 रोजी 13.20 वा. सु. शम्स चौक येथील आपल्या ताब्यातील पानटपरी व्यवसायासाठी चालू ठेवली. यावरुन पोना- सायलू बिरमवार यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमुद आरोपीविरुध्द भा.दं.वि. कलम- 188 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments