Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता 


निसर्ग चक्रीवादळ: नागरीकांनी आपली काळजी घेण्याचे  आवाहनउस्मानाबाद -  महाराष्ट्रात आज दि. 03.06.2020 रोजी ‘निसर्ग चक्रीवादळ’ कोकण किणारपट्टीवर  घोंगावत असुन काही प्रमाणात ते नाशिककडे सरकले आहे. त्या अनुशंगाने आपल्या उस्मानाबाद जिल्हा परिसरात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होउ शकतो.

            या पार्श्वभूमीवर जनतेने आपल्या घरात- वास्तूत सुरक्षीत रहावे. विनाकारण घरा बाहेर पडू नये. आपली जिवीत व वित्त हानी होनार नाही या दृष्टीने सतर्क रहावे. विज वाहीनी खांब, तारा तुटल्या असल्यास त्यांस न हाताळता संबंधीत विज कार्यालयास कळवावे. वृक्ष उन्मळुन, पाणी तुंबल्याने रस्ता बंद झाल्यास त्याची माहिती स्थानिक स्वराज्य संस्था, अग्निशमन विभाग, पोलीस, सार्वजनिक बांधकाम खाते इत्यादी ठिकाणी कळवावे. असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी जिल्ह्यातील जनतेस केले आहे.No comments