Header Ads

वाटेफळ, सोनेवाडी गावास खा. ओमराजे निंबाळकर यांची भेटपरंडा - तालुक्यातील वाटेफळ व भूम तालुक्यातील सोनेवाडी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या गावास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट देऊन प्रशासनामार्फत केलेल्या आवश्यक त्या उपायोजनाची पाहणी केली.

आयुष्य मंत्रालयाने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-30 या गोळ्याचा वापर कसा करावा तसेच येणाऱ्या काळात कोरोना बाधित रुग्ण प्रति कोणताही भेदभाव न ठेवता त्याला परत मूळ प्रवाहात आणण्यासाठी मानसिक आधार व बळ द्या, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी यांनी सतर्क राहावे. तसेच ग्रामस्थांनी प्रशासन मार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन खा. ओमराजे यांनी यावेळी केले.

यावेळी नेते बाळासाहेब मांगले, गिरवलीचे सतिष मोटे, पं. स.सदस्य शिवाजी भडके, परंडा तहसीलदार श्री.अनिलकुमार हेळकर, भूम तहसीलदार सौ. उषाकिरण श्रुंगारे मॅडम, परंडा गटविकास अधिकारी श्री.चकोर, भूम गटविकास अधिकारी श्री.राजू कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद, डॉ. संदिप शिनगारे, वाटेफळ ग्रामसेवक श्री.मदने, उपसरपंच सुभाष भांडवलकर, ग्रामसेवक बाळासाहेब हांगे, भोरे मॅडम, सोनेवाडी सरपंच सतिष सोने, दशरथ मुळीक,अशोक सोने, पै.राहुल भांडवलकर, शंकर भांडवलकर, भाऊसाहेब भांडवलकर, सतिष भांडवलकर तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

2 comments

सुनिल said...

तालुकानिहाय रुग्ण बरे झालेले दया

VP said...

तालुकानिहाय रुग्ण बरे झालेले दया