Header Ads

शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी सुविधा उपलब्ध असताना रुग्णाना पाठवले जाते खासगी सेंटरकडे !

खासगी सोनोग्राफी सेंटरचे  वैद्यकीय अधिकाऱ्यांना कमिशन ? उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालय आणि शासकीय स्त्री रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध असताना येथील वैद्यकीय अधिकारी रुग्णांना खासगी सोनोग्राफी सेंटरचा रस्ता दाखवत असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.घाटंग्री ता. उस्मानाबाद येथील एक गरोदर माता नामे पार्वती उत्तम शिंदे ही २६ मे रोजी शासकीय स्त्री रुग्णालयात  आरोग्य तपासणीसाठी गेली  असता, कर्तव्यावर हजर असलेले वैद्यकीय अधिकारी यांनी सोनोग्राफी करण्यास सांगितले. त्यानंतर सदर माता सोनोग्राफी विभागात  गेली असता, तिला स्त्री रुग्णालयात किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी होत नसल्याचे सांगून खासगी सोनोग्राफी सेंटरमध्ये जाण्यास सांगितले.या संदर्भात आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी शासकीय स्त्री रुग्णालयाच्या कार्यालयीन अधीक्षक यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी ही सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगितले तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांनी सोनोग्राफी सुविधा उपलब्ध असलयाचे सांगितले
हा अनुभव अनेक रुग्णांना येत असून, जिल्हा शासकीय रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन शोभेचे बाहुले आहेत का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

काय आहे तक्रार ? 

Posted by Osmanabad Live on Tuesday, June 2, 2020

No comments