अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची गळफास घेऊन आत्महत्या

 

अभिनेता  सुशांत सिंह राजपूत याची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई.  बॉलिवूडमधील एक चांगला अभिनेता म्हणून ओळख असलेला सुशांत सिंह राजपूत ( याने आत्महत्या केली आहे.  वांद्र्यातील घरी गळफास घेऊन त्यांनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती मिळाली आहे.

पवित्र रिश्ता या मालिकेतून अभिनयाची सुरुवात करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अद्याप या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. त्याच्या घरातील नोकराने सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिला आणि पोलिसांना या घटनेची सूचना दिली. सुशांतला महेंद्रसिंग धोनीचा जीनवपट 'एम. एस.धोनी' चित्रपटातून खरी ओळख मिळाली होती.

सुशांत सिंह राजपूतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी झाला होता. सुरुवातीला मालिकांमधून आपल्या सुरूवात करणाऱ्या सुशांतने 2013 सालच्या काय पोछे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या.त्याच्या कारकिर्दीला खरा ब्रेक मिळाला तो धोनीवर केलेल्या बायोपिकमधील भूमिकेनंतर. त्यांनं एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी मध्ये महेंद्रसिंह धोनीची भूमिका केली होती.सोबतच शुद्ध देसी रोमान्स, पी.के., डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी अशा सिनेमांमध्ये त्याने लक्षवेधी भूमिका निभावल्या होत्या. अभिनय क्षेत्रात त्यानं किस देश में है मेरा दिल या मालिकेद्वारे पदार्पण केले होते. तर पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे तो घराघरात पोहोचला होता.

सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात बॅकअप डांसर म्हणून केली होती. त्यानंतर सुशांतने सर्वात आधी 'किस देश में है मेरा दिल' नावाच्या मालिकेतून अभिनय सुरू केला, पण त्याला खरी ओळख एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता'मधून मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 'काय पो छे'मधून केली होती. त्यानंतर 'शुद्ध देसी रोमांस' आणि भारतीय क्रिकट कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा बायोपिक 'एम एस धोनी' मध्ये काम केले, त्यानंतर आमिर खानसोबत 'पीके' चित्रपट आणि 'छिछोरे' चित्रपटातही काम काम केले होते. विशेष म्हणजे, छिछोरे चित्रपटात सुशांतने आत्महत्या न करण्याचा संदेश दिला होता. पण, त्यानेच आज आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पाच दिवसांपूर्वीच सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सलियनने 8 जूनला मुंबईतील एका इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. दिशाने मुंबईच्या मालाडमधील 14 मजली इमारतीवरुन उडी मारली.

काय पो छे, शुद्ध देसी रोमांस, पीके, डिटेक्टिव व्योमकेश बख्शी, एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी, राब्ता, वेल्कम टू न्यू यॉर्क, केदारनाथ, सोनचिड़िया, छिछोरे, ड्राइव आणि दिल बेचारा चित्रपटात काम केले.

मागील काही दिवसात बॉलिवूडमधील अनेक कलाकार जग सोडून गेले आहेत. एप्रिल महिन्यात इरफान खान आणि ऋषी कपूरसारख्या मोठ्या कलाकारांचे निधन झाले. तर, नुकतच सिंगर आणि म्यूजिक कंपोजर वाजिद खानचे 42 व्या वर्षी निधन झाले.

From around the web