सोलापूर शहरात घरफोड्या करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद

 
७ लाख ३१ हजाराचा मुद्देमाल जप्त ; शहर गुन्हे शाखेची कामगिरी 

सोलापूर शहरात घरफोड्या करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद


सोलापूर - सोलापूर शहरात भरदिवसा आणि रात्रीच्या सुमारास घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद करून  ७ लाख ३१ हजार ५५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

सोलापूर शहरात मागील काही दिवसापासून भरदिवसा आणि रात्रीच्या सुमारास घरफोडीचे प्रकार वाढले होते. या प्रकरणी शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होते. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या गुन्हाचा  तपास शहर गुन्हे शाखेकडे दिला होता. त्यानंतर  पोलीस उपयुक्त बापू बांगर यांनी गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हे तपास कामी मार्गदर्शन केले होते. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी या घरफोड्या प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार जेरबंद केले आहेत. 

बाळू देविदास काळे आणि संदीप प्रल्हाद चव्हाण ( रा. दोघे विडी घरकुल, सोलापूर ) अशी या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. पोलिसांनी घरफोड्यातील सोन्या- चांदीचे दागिने, टीव्ही, कॉम्प्युटर, गॅस सिलेंडर असा ७ लाख ३१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपयुक्त ( गुन्हे ) बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप ( गुन्हे ) यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप नागटिळक, इमाम इनामदार, पोलीस नाईक विजय वाळके, संदीप जावळे, मंगेश भुसारे, संतोष येळे, अय्याज बागलकोटे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे, अश्रुभान दुधाळ, सोमनाथ सुरवसे, सागर गुंड, चालक सतीश काटे यांनी पार पाडली.  

सोलापूर शहरात घरफोड्या करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद ७ लाख ३१ हजाराचा मुद्देमाल जप्त ; शहर गुन्हे शाखेची कामगिरी...

Posted by Osmanabad Live on  Wednesday, June 17, 2020

From around the web