तुळजापूर तालुक्यातील सात जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह

 
तुळजापूर तालुक्यातील सात जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील सात जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटिव्ह आला आहे, सर्वच्या सर्व रुग्ण तुळजापूर तालुक्यातील आहेत.त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३८ झाली आहे. 



आज 20 जून रोजी  सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथून 30 स्वाब तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत, त्यापैकी सात पॉजिटिव्ह, एक inconclusive व 22  निगेटिव्ह असा रिपोर्ट आला आहे.



पॉजिटीव्ह दोन रुग्ण  बोळेगाव ता. तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत व पाच  रुग्ण नळदुर्ग ता तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉजिटिव्ह पॉजिटिव्ह संपर्कातील आहेत


एकूण कोरोना बाधित रुग्ण - 175
बरे झालेले रुग्ण 131
मृत्यू -6
एक्टिव्ह रुग्ण - 38


From around the web