Header Ads

अणदूर : अवैधपणे तलवार बाळगणारे दोघे अटकेत  
 नळदुर्ग: तलवार हाती घेतलेल्या तरुणाचे छायाचित्र एका व्हाट्सअप गटात वर्षभरापुर्वी प्रसारीत झाले होते. अशी गोपनीय माहिती नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास मिळाली होती. त्यावरुन पोलीसांनी सायबर पोलीस ठाणे व खबऱ्यांकडून गोपनीय माहिती गोळा करुन दि. 15.06.2020 रोजी 14.30 वा. सु. वत्सला नगर, मौजे अणदूर, ता. तुळजापूर येथील 1)मारुती विठ्ठल बागडे 2)अभिजीत तुकाराम महाबोले यांना ताब्यात घेउन विनापरवाना बाळगलेल्या दोन तलवारी त्यांच्या घरातून जप्त केल्या आहेत. यावरुन त्यांच्या विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम- 4, 25 अन्वये गुन्हा दि. 15.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments