Header Ads

सन- 2020 मध्ये आज पर्यंत स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी उस्मानाबाद - पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन व  अपर पोलीस अधीक्षक  संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा (LCB) च्या पोलीस निरीक्षक दगुभाई शेख यांच्या पथकाने सन- 2020 मध्ये आज पर्यंत विविध गुन्ह्यांत उल्लेखनीय तपास करुन खालील प्रमाणे विविध गंभीर गुन्ह्यांची उकल करुन चोरीस गेलेली मालमत्ता जप्त केली आहे.

1)चोरी: 62 गुन्हे उघडकीस आणले असुन त्यात 110 आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून चोरीचा 32,38,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 64 मोटारसायकल, 1,97,500/-रु. किंमतीचे सोने- दागिने, 9,05,000/-रु. किंमतीची शेती उपकरणे व शेत माल यांचा समावेश आहे.

2)खुन: खुनाच्या प्रकरणात गुंतागुंतीचे 2 गुन्हे उघडकीस आणुन अनोळखी मयताची ओळख पटवून आरोपी निष्पन्न केले आहेत.

3)फरारी आरोपी (Abscondal): विविध गुन्ह्यातील आरोपी हे जामीनावर सुटल्या नंतर फरार होतात. त्यामुळे न्यायालयीन सुनावनीत अडथळे येतात. अशा आरोपींचा गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेउन आज पर्यंत 60 हुन अधिक आरोपींना विविध ठिकाणांहुन अटक करण्यात आली आहे.

4)पाहिजे आरोपी (Wanted): विविध गुन्ह्यातील आरोपी हे हे पोलीसांना गुंगारा देउन लपुन- छपुन राहतात. त्यामुळे तपासकार्यात अडथळे येतात. अशा आरोपींचा गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेउन आज पर्यंत 26 हुन अधिक आरोपींना विविध ठिकाणांहुन अटक करण्यात आली आहे.

5)अवैध मद्य विरोधी कारवाई: जिल्हा हद्दीत अवैध दारु निर्मीती, विक्री, वाहतुक करणाऱ्या आरोपींविरुध्द आज पर्यंत एकुण 29 कारवाया करुन 35 आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींच्या ताब्यातून देशी, विदेशी, गावठी अशी एकुण 4,42,283/-रु. किंमतीचे मद्य जप्त करण्यात आले.

5)जुगार विरोधी कारवाई: जिल्हा हद्दीत मटका, तिरट, इत्यादी प्रकारचा जुगार खेळणाऱ्या व खेळविनाऱ्या आरोपींविरुध्द आज पर्यंत एकुण 18कारवाया करुन 26 आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींच्या ताब्यातून देशी, विदेशी, गावठी अशी एकुण 1,11,530/-रु. किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

            पथकाच्या या कामगीरीबद्दल  पोलीस अधीक्षक व अपर पोलीसअधीक्षक यांनी अभिनंदन केले असून पथकातील सपोनि श्री. खांडेकर, पोउपनि श्री. माने, खोडेवाड, सपोफौ- घायाळ, पोहेकॉ- माळी, जगदाळे, झोंबाडे, जगताप, थोरात, रोकडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, चव्हाण, सय्यद व इतर सदस्यांना उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल बक्षीसे देण्यात आली आहेत.

No comments