Header Ads

चोरीच्या पेरणीयंत्रासह संशयीत ताब्यातउस्मानाबाद  - महेश औदुंबर उंबरे रा. वाघोली, ता. उस्मानाबाद यांच्या मौजे वाघोली शेत गट क्र. 214/1 मधील ‘ट्रॅक्टर ड्राईव्ह स्पीड ड्रील’ या कंपनीचे पेरणी यंत्र (किं.अं. 22,000/-रु.) दि. 04.06.2020 रोजी मध्य रात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते. यावरुन पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) येथे गु.र.क्र. 133/2020 दाखल आहे.
सदर गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी- बिभिषन नाना काळे, वय 19 वर्षे, रा. तेरणानगर पारधी पिढी, ता. उस्मानाबाद यास ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून चोरुन नेलेला वरील मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरीत तपासकामी आरोपीस पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, संतोष गव्हाणे यांच्या पथकाने केली आहे.

No comments