Header Ads

चोरीच्या दोन मोटारसायकलसह संशयीत ताब्यातउस्मानाबाद - मोटारसायकली चोरणाऱ्या एका  चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी  अटक करून त्याच्या ताब्यातील दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आज दि. 04.06.2020 रोजी जोगेश्वरी पारधी पिढी, पारा, ता. वाशी येथे संशयीत- कालिदास विनायक काळे याच्या ताब्यात एच.एफ. डीलक्स व पॅशन प्लस या मॉडेलच्या दोन मोटारसायकल आढळल्या. त्या मोटारसायकलींच्या ताबा- मालकी बाबत तो समाधानकारक माहिती न देता उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने त्यास मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. नमुद दोन्ही मोटारसायकलचा इंजीन क्रमांक व चासी क्रमांकाच्या आधारे पोलीसांनी वाहन मालकांची माहिती घेउन त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या दोन्ही मोटारसायकली अनुक्रमे- जामखेड पो.ठा. व पंढरपूर पो.ठा. हद्दीतून चोरीस गेल्या असल्याचे सांगीतले.

ही कारवाई पोनि  दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, पोना- समाधान वाघमारे, संतोष गव्हाणे यांच्या पथकाने केली आहे

No comments