Header Ads

पाहिजे आरोपी अटकेतउस्मानाबाद : परंडा पो.ठा. गु.र.क्र. 110/2018 या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- श्रीमती- छाया हरी काळे, रा. सावरगांव, ता. भूम ही पोलीसांना गुंगारा देत होती. स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तीस आज दि. 26.06.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी आरोपीस पो.ठा. परंडा च्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- जगताप, थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ- अविनाश मारलापल्ले यांच्या पथकाने केली आहे.

अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाया.
पो.ठा. येरमाळा: जयश्री काकासाहेब वाघमारे, रा. गौर, ता. कळंब या दि. 25.06.2020 रोजी मौजे अवदुतवाडी फाटा येथे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने देशी दारुच्या 180 मी.ली. च्या 20 बाटल्या (किं.अं. 1,600/-रु.) बाळगल्या असतांना स्थानिक गुन्हे शाखा च्या पथकास आढळल्या.
पो.ठा. तुळजापूर: किरण थाउ राठोड व सुशाला थाउ राठोड, दोघे रा. मार्डी, ता. सोलापूर हे दि. 26.06.2020 रोजी दारुची अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने मो.सा. क्र. एम.एच. 13 डीएफ 1279 वरुन 60 ली. गावठी दारु (किं.अं. 3,600/-रु.) ची वाहतुक करत असतांना अक्कलकोट –तुळजापूर रस्त्यावरील कसई फाटा येथे पो.ठा. तुळजापूर यांच्या पथकास आढळले.
       यावरुन नमूद तीघांविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

मोटार वाहन कायदा उल्लंघन: 195 कारवायांत 43,800 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.
उस्मानाबाद जिल्हा: उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा-उस्मानाबाद यांनी दि. 24/06/2020 रोजी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुध्द 195 कारवाया केल्या. त्यातुन 41,800 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.

No comments