Header Ads

पोलीसांस धक्काबुकी केली, गुन्हा दाखल
आंबी: मौजे जेजला, ता. परंडा या गावी दि. 24.06.2020 रोजी सावत्र भावांमध्ये जमीन वाटपावरुन भांडण चालू होते. ही माहिती मिळताच आंबी पोलीस ठाण्याचे सपोनि- पालवे, पोहेकॉ- बाळासाहेब होडशीळ यांनी  मौजे जेजला येथे जाउन हे भांडण मिटवले होते. दि. 25.06.2020 रोजी रात्री 10.30 वा. सु. पोहेकॉ- होडशीळ हे पोलीस पथकासह मौजे जेजला गावात शासकीय वाहनाने गस्त करत होते. यावेळी गावातील- अनिल नवनाथ शिंदे या तरुणाने मोटारसायकल पोलीस वाहना समोर आडवी लावली. त्या तरुणाने आरडाओरड करत पोहेकॉ- होडशीळ यांच्या जवळ येउन त्यांची गचांडी पकडून धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. तसेच कालचा हवालदार तूच आहे का ? मला पण मुंबईचा ड्रायव्हर म्हणतात. मी कंटेनर घेउन आलो आहे. मी एक-एकाला कंटेनरच्या चाकाखाली घेउन मारत असतो.” अशी पोहेकॉ- होडशीळ यांना धमकी दिली. यावर सोबत असलेल्या पोलीस पथकाने त्या तरुणास पकडले. यावरुन पोहेकॉ- होडशीळ यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन अनिल शिंदे याच्या विरुध्द भा.दं.सं. कलम- 353, 341, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दि. 26.06.2020 रोजी नोंदवला आहे.

फसवणूक.
पोलीस ठाणे, आनंदनगर: रणजित लिंबराज कांबळे, रा. संभाजी नगर, उस्मानाबाद यांसह त्यांचे वडील व नातेवाईक अशा सर्वांनी सन- 2016-17 या काळात एकुण 62,00,000/-रु. ची मुदत ठेव सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्था, उस्मानाबाद येथे दसादशे 14.40 दराने ठेवली होती. ठेवीची मुदत संपल्यानंतरही पतसंस्थेने त्यांना मुळ रक्कम- व्याज परत न करता त्यांची फसवणुक केली . अशा मजकुराच्या रणजित कांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळातील सदस्य 1)बालाजी साळुंके 2)उस्मान निचलकर (उपाध्यक्ष) 3)गोविंद चव्हाण 4)सय्यद समियोद्दीन मशायक 5)सर्वोत्तम द्वारकानाथ कटके 6)सिध्दार्थ बनसोडे 7)वैशाली देशमुख 8)सरोजा चव्हाण 9)रुशिकेश हंटाचे 10)श्रीकांत तेरकर 11)मिलिंद पेठे सर्व रा. उस्मानाबाद यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 420, 406, 34, सह महाराष्ट्र ठेविदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दि. 25.06.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी.

पोलीस ठाणे, उमरगा: गंगाबाई सुभाष चव्हाण, रा. कदेर, ता. उमरगा यांच्या राहत्या घराच्या छताचे पत्रे अज्ञात चोरट्याने दि. 24.06.2020 रोजी मध्य रात्री उचकटून घरातील 10 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या गंगाबाई चव्हाण यांच्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 26.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments