Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल
 परंडा: श्रावण श्रीहरी माने, रा. कौडगांव, ता. परंडा हे त्यांची पत्नी- संगीता यांसह दि. 24.06.2020 रोजी 12.30 वा. सु. आपल्या राहत्या घरा समोर थांबले होते. यावेळी गावकरी- पाटील चौरंग ठवरे, आप्पा ठवरे, बालाजी ठवरे, विजय गोफणे, दत्ता गोफणे, सुखदेव गोफणे या सर्वानी बेकायदेशीर जमाव जमवून पुवीच्या भांडणाची कुरापत काढून श्रावण माने यांना काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच पती- श्रावण माने यांना होत असलेली मारहाण सोडवण्यास आलेल्या संगीता यांसही नमूद आरोपींनी धक्काबुक्की केली. या मारहाणीत श्रावण माने यांचा डाव्या पायाचे हाड मोडले. अशा मजकुराच्या संगीता माने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 25.06.2020 रोजी नोंदवला आहे.


 ढोकी: प्रमोद शिवराम डक, रा. डकवाडी, ता. उस्मानाबाद हे दि. 20.06.2020 रोजी 11.30 वा. सु. मौजे डकवाडी येथील आपल्या शेतात पेरणी करत होते. यावेळी भाऊबंद- विकास डक, रामभाउ डक, नारायण डक या तीघांनी सामाईक बांधावर पेरणीचे व गवत बांधावर टाकल्याचे कारणावरुन प्रमोद डक यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी दाताळ्याने मारहाण करुन जखमी करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात प्रमोद डक यांच्या डाव्या पायाचा गुडघ्याचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या प्रमोद डक यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 25.06.2020 रोजी नोंदवला आहे.


 वाशी: राजेंद्र नागनाथ राउत, रा. सारोळा (मां.), ता. वाशी हे दि. 24.06.2020 रोजी 17.30 वा. सु. त्यांच्या राहत्या घरा समोरील मंदीरा जवळ बसले होते. यावेळी भाऊबंद- अमृत राऊत यांनी आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन राजेंद्र राउत यांना शिवीगाळ करुन, कुऱ्हाडीने जबड्यावर, गळ्यावर मारहाण करुन गंभीर जखमी केले व तो पळून गेला. अशा मजकुराच्या राजेंद्र राउत यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन अमृत राउत याच्याविरुध्द गुन्हा दि. 25.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments