Header Ads

मद्यधुंद अवस्थेत मोटरसायकल चालवली, गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, आनंदनगर: महेश नारायण साळुंके, रा. पोस्ट कॉलनी, उस्मानाबाद हा दि. 29.06.2020 रोजी 11.00 वा. सु. जिल्हा न्यायालया समोरील चौकात मो.सा. क्र. एम.एच. 12 एलआर 3456 ही मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे चालत असतांना पो.ठा. आनंदनगर च्या पथकास आढळला. यावरुन पोकॉ- मारोती वाघ यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महेश साळुंके याच्या विरुध्द भा.दं.सं. कलम- 279 सह मो.वा.का. कलम- 185 अन्वये गुन्हा दि. 29.06.2020 रोजी नोंदवला आहे.

अवैध मद्य विक्री विरोधी कारवाया.
पोलीस ठाणे, तुळजापूर: ज्ञानदेव माधव राऊत, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर हा दि. 29.06.2020 रोजी मौजे काक्रंबा येथील कासार गल्ली येथे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 10 ली. गावठी दारु (किं.अं. 800/-रु.) बाळगाला असतांना पो.ठा. तुळजापूर यांच्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, परंडा: भारत बबुखान गवारे, जवळा, ता. परंडा हा दि. 29.06.2020 रोजी मौजे सावदरवाडी शिवारात दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने पो.ठा. परंडा यांच्या पथकास आढळला. पोलीसांची चाहुल जागताच तो घटनास्थळावरुन पळुन गेला. पोलीसांनी घटनास्थळावरुन देशी दारुच्या 24 बाटल्या (किं.अं. 1,440/-रु.) जप्त केल्या आहेत.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): लताबाई पवार, रा. वाघोली, ता. कळंब या दि. 29.06.2020 रोजी मौजे येडशी येथील जुन्या रेल्वेस्थानका लगत दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 10 ली. गावठी दारु (किं.अं. 550/-रु.) बाळगल्या असतांना पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) यांच्या पथकास आढळल्या.
       यावरुन वरील तीघांविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.मोटार वाहन कायदा उल्लंघन: 217 कारवाया- 49,700 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.
उस्मानाबाद जिल्हा: उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा-उस्मानाबाद यांनी दि. 29/06/2020 रोजी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुध्द 217 कारवाया केल्या. त्यातुन 49,700 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.

No comments