Header Ads

खुनाच्या गुन्ह्यातील वाँटेड  आरोपी अटकेत


उस्मानाबाद -  पो.ठा. उमरगा गु.र.क्र. 172/2020 भा.दं.वि. कलम- 302, 143, 147, 148, 149 या गुन्ह्यात पाहिजे आरोपी- निनाद किसनराव महाडिक वय 25 वर्षे, रा. कर्वेनगर, पुणे यास स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 08.06.2020 रोजी तुळजापूर येथून ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी पो.ठा. उमरगा च्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. पांडुरंग माने, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ- अविनाश मरलापल्ले यांच्या पथकाने केली आहे.


चोरी.
 कळंब: गणेश लिंबराज तावडे, रा. पिंपळगाव (लिंगी), ता. वाशी यांनी आपली हिरो एचएफ डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 14 एचपी 0263 ही (किं.अं. 47,000/-रु.) दि. 30.05.2020 रोजी 16.00 ते 16.30 वा. चे दरम्यान आंबेडकर चौक, कळंब येथील पानटपरीच्या बाजूस लावली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 07.06.2020 रोजी नोंदवला आहे.


No comments