Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात  हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 


पोलीस ठाणे, ढोकी: अजिनाथ विश्वनाथ पांढरे, रा. दाऊतपूर, ता. उस्मानाबाद हे आपल्या कुटूंबीयांसह दि. 14.06.2020 रोजी 19.14 वा. सु. मौजे दाऊतपुर येथील आपल्या शेतात रस्ता तयार करत होते. यावेळी 1)भास्क्र देवकर 2)दगडू देवकर 3) जगदीश देवकर 4) मंगेश देवकर 5) सुसाबाई देवकर 6) भागुबाई देवकर व अन्य 5 व्यक्ती या सर्वांनी मिळुन बेकायदेशीर जमाव जमवून शेतातील रस्त्याच्या कारणावरुन गावातीलच- अजिनाथ पांढरे यांसह बालाजी पांढरे, परमेश्वर पांढरे, कलावती पांढरे, छायाबाई पांढरे, सखुबाई पांढरे यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, काठी- कुऱ्हाडीने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अजिनाथ पांढरे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 15.06.2020 रोजी नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, तामलवाडी: मिथुन सुखदेव जाधव, रा. खडकी तांडा, ता. तुळजापूर हे दि. 15.06.2020 रोजी 17.30 वा. सु. मौजे खडकी तांडा येथील रस्त्याने घरी जात होते. यावेळी तांड्यावरील- झापु राठोड, विनायक राठोड, राहुल राठोड व अन्य 6 व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव जमवून पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून मिथुन जाधव यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, वायरने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मिथुन जाधव यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 15.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments