Header Ads

नोकराने केला मालकाचा विश्वासघात 

१ लाख ४५ हजार रुपये घेऊन पोबारा पोलीस ठाणे, तुळजापूर: महेश रामचंद्र शिंदे, रा. भिसे चौक, उस्मानाबाद यांच्याकडे सुधाकर सेनगोंडा, रा. सेलम, जि.सेलम, राज्य- तामिळनाडू हा व्यवस्थापक म्हणुन कामास होता. दि. 02.06.2020 रोजी मालक- महेश शिंदे यांनी व्यवस्थापक- सुधाकर यास कुपनलीका खोदकाम यंत्राचे सुटे भाग आणन्यासाठी 1,45,170/-रु. रोख रक्कम दिली. परंतु, सुधाकर याने तसे साहित्य खरेदी करुन आणले नाही व मालकास पैसे ही परत केले नाहीत. अशा प्रकारे नोकराने मालकाचा विश्वासघात केला. अशा मजकुराच्या महेश शिंदे यांच्या प्रथम खबरेवरुन सुधाकर सेनगोंडा याच्या विरुध्द भा.दं.वि. कलम- 406 अन्वये गुन्हा दि. 12.06.2020 रोजी नोंदवला आहे.


जुगार अड्ड्यावर छापा.”

पोलीस ठाणे, तामलवाडी: जैनोद्दीन उस्मान आत्तार, रा. काटी, ता. तुळजापूर हा दि. 11.06.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 1,860/-रु. च्या मालासह पो.ठा. तामलवाडी च्या पथकास आढळुन आला. यावरुन त्याच्याविरुध्द गुन्हा दि. 12.06.2020 रोजी नोंदवला आहे.


रस्ता अपघात.

पोलीस ठाणे, मुरुम: राजेंद्र नरबा खटके, सुरेखा खटके रा. कोरेगाव, ता. उमरगा हे दोघे पती-पत्नी दि. 05.05.2020 रोजी 09.00 वा. सु. मौजे कोरेगाव ते लोहगांव असा मो.सा. क्र. एम.एच. 25 वाय 2139 ने प्रवास करत होते. प्रवासा दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर मौजे दाळींब शिवारात कार क्र. एम.एच. 02 सीएल 1243 चे चालक- बाबु खान चांदसाब कमाल रा. दाळींब, ता. उमरगा यांनी कार निष्काळजीपणे चालवून राजेंद्र खटके यांच्या नमुद मो.सा. ला समोरुन धडक दिली. या अपघातात खटके पती- पत्नी हे दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजवीज न करता, अपघाताची खबर पोलीसांना न देता नमुद कार चालक घटनास्थळावरुन वाहनासह निघुन गेला. अशा मजकुराच्या राजेंद्र खटके यांच्या फिर्यादीवरुन नमुद कार चालकाविरुध्द गुन्हा दि. 11.06.2020 रोजी नोंदवला आहे.

1 comment

AMBADAS V GORE said...

अशा वाहनचालकांवर कायदे शीर कारवाई करावी...