Header Ads

तीन अपघातांत दोन तरुण मयत


पोलीस ठाणे, शिराढोण: नंदु बाळु यादव, रा. लोहटा (पु.), ता. कळंब हा दि. 25.05.2020 रोजी रात्री 08.30 वा. मौजे करंजकल्ला शिवारात नितीन किसन पवार यांच्या शेतात ट्रॅक्टर- रोटाव्हेटर द्वारे मशागत करत होता. यावेळी चालक- नंदु याचा धावत्या ट्रॅक्टर वरील ताबा सुटून तो ट्रॅक्टरहून खाली पडून गंभीर जखमी झाला. हा अनियंत्रित झालेला ट्रॅक्टर विहीरीच्या दिशेने जाउ लागल्याने नितीन पवार यांचा मुलगा अनिकेत उर्फ आबा, वय 18 वर्षे हा ट्रॅक्टर थांबवण्यासाठी ट्रॅक्टरवर चढत असतांना रोटाव्हेटर मध्ये अडकून मयत झाला आहे. अशा मजकुराच्या नितीन पवार यांच्या प्रथम खबरेवरुन ट्रॅक्टर चालक- नंदू यादव विरुध्द भा.दं.वि. कलम- 279, 338, 304 (अ) अन्वये गुन्हा दि. 16.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उमरगा: श्रीकांत मधुकर जाधव, रा. सुंदरवाडी व त्यांचे मेव्हुने- बालाजी सुरेश पवार, वय 35 वर्षे, रा. कवठा, ता. उमरगा असे दोघे दि. 29.05.2020 रोजी 10.30 वा. सु. एकुरगा ते उमरगा असा मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 4048 ने प्रवास करत जात होते. दरम्यान एकुरगा गावाजवळ गावातीलच- कमलाकर व्यंकट कुन्हाळे याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 0037 ही निष्काळजीपणे चालवून श्रीकांत जाधव चालवत असलेल्या वरील मो.सा. ला समोरुन धडक दिली. या अपघातात श्रीकांत जाधव व बालाजी पवार हे दोघेही जखमी होउन बालाजी पवार यांचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यु झाला. अशा मजकुराच्या श्रीकांत जाधव यांच्या फिर्यादीवरुन नमुद मो.सा. चालकाविरुध्द गुन्हा दि. 16.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, परंडा: राहुल सोमनाथ लोकरे, रा. घारगाव, ता. परंडा व बाळु बजरंग चोळशे, रा. वाकडी, ता. पंरडा हे दोघे दि. 14.06.2020 रोजी मौजे पिंपळवाडी शिवारातील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 12 डीएल 9047 ने प्रवास करत होते. दरम्यान ट्रक क्र. एम.एच. 42 टी 1052 च्या अज्ञात चालकाने ट्रक निष्काळजीपणे चालवून बाळु चोळशे चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला समोरुन धडक दिली. या अपघातात राहुल लोकरे व बाळु चोळशे हे दोघेही गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या सोमनाथ केरबा लोकरे यांच्या फिर्यादीवरुन नमुद ट्रकच्या आज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दि. 16.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments