Header Ads

लोहारा: जुगार अड्ड्यावर छापापोलीस ठाणे, लोहारा: 1)योगीराज कारभारी 2)संतोष दंडगुले 3)नवनाथ बनसोडे 4)शिवाजी दंडगुले 5)बाळु चव्हाण 6)संजय चव्हाण, सर्व रा. जेवळी, ता. लोहारा 7)नागनाथ कारले 8)शिवराज कारले दोघे रा. विलासपूर पांढरी हे सर्व दि. 15.06.2020 रोजी भिजप्पा कारभारी यांच्या विलासपुर पांढरी शिवारातील शेतात तिरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्यासह रोख रक्कम 5,020/-रु. व तीन मोटारसायकल, सहा मोबाईल फोन च्या मालासह पो.ठा. लोहारा च्या पथकास आढळुन आले. तर, दुसऱ्या घटनेत याच दिवशी मौजे जेवळी येथील सतीबा खोत यांच्या शेतात 1)खंडेशा कारभारी 2)बालाजी साळुंखे 3)पिंटू जाधव 4)आदीनाथ पाटील 5)इस्माईल शेख 6)मोहन चव्हाण 7)बसवराज तावशे 8)संजय ल्यामोळ सर्व रा. जेवळी हे सर्व तिरट जूगार खेळत असतांना जुगाराचे साहित्यासह रोख रक्कम 4,980/-रु. व मो.सा., मोबाईल फोनसह पो.ठा. लोहारा यांच्या पथकास आढळुन आले.

यावरुन नमूद सर्व वय्क्तींविरुध्द स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. लोहारा येथे नोंदवण्यात आले आहेत.चोरी.
पोलीस ठाणे, आनंदनगर: विशाल राजाराम मगर, रा. शिंगोली, ता. उस्मानाबाद यांनी त्यांची यामाहा इन्टायझर मोटारसायकल क्र. एम.एच. 12 सीएम 6654 ही दि. 12.06.2020 रोजी 12.00 ते 16.00 वा. चे दरम्यान मौजे शिंगोली शिवारातील मेघदुत हॉटेल येथे लावली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 16.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments