Header Ads

रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन करुन कुपनलीका खोदकाम, गुन्हा दाखल
उस्मानाबाद -  कोविड- 19 या रोगाच्या पार्श्वभुमीवर शासकीय आदेशाने अत्यावश्यक बाबी वगळता रात्री 09.00 ते सकाळी 05.00 वा. चे दरम्यान संचारबंदी अंमलात आहे. या संचारबंदीचे उल्लंघन करुन खलीफा गफर कुरेशी, रा. ख्वाजानगर, उस्मानाबाद यांनी दि. 04.06.2020 रोजी 23.00 वा. धाराशिव मर्दीनी कमान, उस्मानाबाद परिसरातील शेरकर यांच्या भुखंडात कुपनलीका खोदनारे यंत्र- ट्रक लाउन कुपनलीका खोदकाम केले. यावरुन पो.ठा. उस्मानाबाद (श.) चे पोउपनि- श्री. दिनेश जाधव यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमुद आरोपीविरुध्द भा.दं.वि. कलम- 188 सह, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

, ढोकी: विजय बबन सोनटक्के, रा. तडवळे (कसबे), ता. उस्मानाबाद याने दि. 04.06.2020 रोजी 19.45 वा. मद्यधुंद अवस्थेत पो.ठा. ढोकी आवारात येउन विनाकारण मोठमोठ्याने आरडा-ओरड करुन, असभ्यपणाचे वर्तन करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला. यावरुन पोकॉ- भगवान मंदुमले यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्याच्याविरुध्द म.दा.का. कलम- 85 (1) सह, म.पो.का. कलम- 112/117 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments