Header Ads

दोन रस्ते अपघात, 2 तरुण मयतपोलीस ठाणे, नळदुर्ग: मेहबुब शमशोद्दीन नदाफ, वय 38 वर्षे, रा. केशरजवळगा हे दि. 07.06.2020 रोजी 12.30 वा. सु. इटकळ ते केशेगाव या रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 3816 ही चालवत जात असतांना श्रध्दा धाब्याजवळील रस्त्यावर समोरील ट्रॅक्टर क्र. एम.एच. 22 बी 9644 हा चालक गजानन पंडीतराव पाटील, रा. मुगळी, ता. अक्कलकोट यांनी अचानक थांबवला. त्यामुळे मेहबुब नदाफ यांची मो.सा. ट्रॅक्टरच्या पाठीमागील बाजूस धडकली. या अपधातात मेहबुब नदाफ हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या शब्बीर बाबुलाल नदाफ रा. केशेगांव, ता. तुळजापूर यांच्या फिर्यादीवरुन नमुद ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा दि. 08.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी: शाम भागवत भंडारे, वय 20 वर्षे व बापुसाहेब शिवाजी मुर्गे दोघे रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हे दोघे दि. 15.05.2020 रोजी 21.15 वा. सु. मौजे ढोकी येथील घोडके पेट्रोल पंपा समोरील रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी असीफ दादामियॉ पठाण, रा. दुधगाव, ता. उस्मानाबाद यांनी मो.सा. क्र. एम.एच. 14 एचएस 9951 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून शाम भंडारे व बापूसाहेब मूर्गे यांना पाठीमागून धडक दिली यात दोघे पादचारी जखमी झाले. या दोघा पादचाऱ्यांना धडकल्या नंतर असीफ पठाण यांची मो.सा. समोरुन येणाऱ्या मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 8103 ला धडकली. यात त्या मो.सा. वरील श्रीहरी लोमटे व संजय देशमुख दोघे रा. देवळाली, ता. कळंब यांच्यासह असीफ पठाण यांच्यासह पाठीमागे बसलेले सहेबाज निजाम पठाण हे जखमी झाले. या अपघातात जखमी पादचारी इसम शाम भागवत भंडारे यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
          अशा मजकुराच्या दत्ता भागवत भंडारे (मयताचा भाऊ) यांच्या फिर्यादीवरुन असीफ पठाण यांच्या विरुध्द गुन्हा दि. 08.06.2020 रोजी नोंदवला आहे.
                                                                                     

No comments