Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखलपरंडा: सर्जेराव किसन तांबिले, रा. शिक्षक सोसायटी, परंडा हे दि. 25.06.2020 रोजी 12.00 वा. सु. आपल्या राहत्या घरी होते. यावेळी धनराज शिवाजी थोरबोले व अन्य दोन व्यक्ती तीघे रा. परंडा यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन सर्जेराव तांबिले यांना शिवीगाळ करुन, लोखंडी गजाने, मारहाण करुन गंभीर जखमी केले. सर्जेराव तांबिले यांची आरडा-ओरड ऐकून नातेवाईकांनी त्यांना उपचारकामी दवाखान्यात दाखल केले. अशा मजकुराच्या सर्जेराव तांबिले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत तीघांविरुध्द गुन्हा दि. 26.06.2020 रोजी नोंदवला आहे.


तुळजापूर: रेखा जयराम भोसले व त्यांची सवत- अनिता जयराम भोसले उर्फ लक्ष्मी दोघी रा. डिकमळ पारधी पिढी, ता. तुळजापूर या दोघी दि. 24.06.2020 रोजी 19.30 वा. सु. आपल्या राहत्या घरा समोर थांबल्या होत्या. यावेळी नातेवाईक- 1)अनिल भोसले 2)अक्षय शिंदे 3)धनु शिंदे, तीघे रा. हंगरगा पाटी 4)सुनिल भोसले 5)मिथुन भोसले 6)भास्कर भोसले, तीघे रा. डिकमळ पारधी पिढी 7)पप्पु शिंदे 8)प्रेम शिंदे 9)लक्ष्मण कांबळे, तीघे रा. तुळजापूर या सर्वांनी रेखा व अनिता यांच्या घरा समोर जाउन शिवीगाळ करुन “तुम्ही आमच्यावर खोट्या केसेस केल्या. आता तुमच्या कुटूंबाला मारुन टाकतो.” असे धमकावले. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगड, काठी, तलवार, कुऱ्हाड, कोयत्याने मारहाण केली. यात अनिता शिंदे यांचा डावा हात मोडला आहे. अशा मजकुराच्या रेखा जयराम भोसले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.सं. कलम- 307, 143, 147, 148, 149, 504, 506, सह आर्म ॲक्ट कलम- 4, 25 अन्वये गुन्हा दि. 26.06.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी.
पोलीस ठाणे, आनंदनगर: गणेश सुभाष भांगे, रा. सांजा रोड, उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो होंडा पॅशन प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए 6598 ही दि. 25.06.2020 रोजी 12.30 ते 13.15 वा. चे दरम्यान जगदंबा आयुर्वेदीक दवाखाना, उस्मानाबाद समोर लावली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 26.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments