Header Ads

मनाई आदेश झुगारुन हॉटेल चालू ठेवले, 3 गुन्हे दाखलउस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी मा. जिल्हाधिकारी यांनी सायंकाळी 07.00 वा. नंतर अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने- आस्थापना बंदीचा मनाई आदेश जारी केला आहे. असे असतांनाही दि. 20.06.2020 रोजी हा मनाई आदेश झुगारुन कृष्णा नामदेव सुरवसे, यांनी बार्शी नाका, उस्मानाबाद येथील ‘राजदरबार हॉटेल’ 21.25 वा. सु. व्यवसायास चालू ठेवले असतांना पो.ठा. आनंदनगर यांच्या पथकास आढळले. तर दुसऱ्या घटनेत अल्ताफ कुरेशी, यांनी बार्शी नाका, उस्मानाबाद येथील ‘कोहीनूर बिर्याणी हॉटेल’ 21.36 वा. सु. व तुकाराम विठ्ठल बागल यांनी माणिक चौक, उस्मानाबाद येथील ‘त्रिवेणी आईस्क्रीम सेंटर’ हे दुकान 22.30 वा. व्यवसायास चालू ठेवले असतांना महसूल विभागाच्या पथकास आढळले.
यावरुन नमूद तीघां विरुध्द सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन 3 स्वतंत्र गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवले आहेत.

चोरी.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): श्रीमती वनमाला माधव क्षिरसागर, रा. बार्शी नाका, उस्मानाबाद यांच्या बार्शीनाका येथील किराणा दुकानाचा कडी कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. 14.06.2020 रोजी मध्य रात्री तोडून दुकानातील रोख रक्कम 1,500/-रु. व 9,147/- रु. किंमतीचा किराणा माल असा एकुण- 10,647/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या वनमाला क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 20.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments