Header Ads

गुटखा बाळगला, 2 गुन्हे दाखल


पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): 1)सुलेमान अलिम कुरेशी 2)शोएब मनसुर शेख, दोघे रा. खिरणीमळा, उस्मानाबाद या दोघांनी दि. 02.06.2020 रोजी आपल्या राहत्या घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले अन्नपदार्थ- गुटख्याचे 192 पुडे (किं.अं.19,200/-रु.) बाळगले. तर दुसऱ्या घटनेत 1)शौकत इसुफ मुल्ला, रा. खाजानगर, उस्मानाबाद हा दि. 15.05.2020 रोजी आपल्या राहत्या घरी गुटख्याचे 80 पुडे (किं.अं.8,000/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळले होते.


            सदर अन्नपदार्थ हा प्रतिबंधीत गुटखा असल्याची खात्री करुन अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रेणूका पाटील यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमुद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 272, 273 सह, अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26, 27, 30 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे दि. 09.06.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल.
पोलीस ठाणे, भूम: पो.ठा. भूम येथील पोना- विक्रम नाईक हे पोलीस पथकासह दि. 09.06.2020 रोजी सकाळी 10.30 वा. सु. भूम शहरात कोविड- 19 संबंधी जनजागृती व अंमलबजावणी कार्य करत होते. यावेळी महादेव शंकर लोखंडे, सुरज महादेव लोखंडे, रा. सरमकुंडी, ता. वाशी हे दोघे पिता- पुत्र नाका- तोंडास मास्क न लावता एकाच  मो.सा. वर बसून जात होते. पालीसांनी त्यांना हटकले असता त्या दोघांनी पोलीस पथकास उध्दटपनाची, अरेरावीची भाषा वापरुन कारवाई करण्यास पोलीसांना विरोध केला. त्या दोघांना पोलीस ठाणे येथे आणले असता त्यांनी व्यक्तीगत मोबाईल कॅमेऱ्याद्वारे पोलीस ठाण्यातील अंतर्गत भाग, कागदपत्रे इत्यादीं प्रतिबंधीत भागाचे ध्वनीचित्र मुद्रण करुन शासकीय गुपीते अधिनियमाचा भंग केला. यावरुन पोना- विक्रम नाईक यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमुद पिता- पुत्र विरुध्द भा.दं.वि. कलम- 353, 188 सह, म.पो.का. कलम- 120 सह, शासकीय गुपीते अधिनियम कलम- 3 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments