Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 
पोलीस ठाणे, तामलवाडी: आण्णासाहेब गणपतराव पाटील, रा. वडगांव (काटी), ता. तुळजापूर व त्यांचा मुलगा- अजय हे दोघे दि. 12.06.2020 रोजी 12.00 वा. सु. मौजे वडगाव (काटी) येथील आपल्या शेतात ट्रॅक्टरने मशागत करत होते. यावेळी गावातीलच- विलास सुरवसे, विकास सुरवसे, शारदा सुरवसे, दिपाली सुरवसे, अंजली सुरवसे या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून, शेतबांधावर ट्रॅक्टर घातल्याच्या कारणावरुन आण्णासाहेब पाटील व अजय पाटील या दोघा पिता- पुत्र यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या आण्णासाहेब पाटील यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 16.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): दशरथ छगन काळे, रा. तुळजापूर नाका, उस्मानाबाद यांनी दि. 13.05.2020 रोजी 19.30 वा. सु. तुळजापूर नाका, उस्मानाबाद येथे कॉलनीतीलच- राजा शेरकर यांना कापडाच्या उधारीचे पैसे मागीतले. यावर चिडून जाउन राजा शेरकर व बाळु छगन पवार या दोघांनी दशरथ काळे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. या मारहाणीत दशरथ काळे यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले. अशा मजकुराच्या दशरथ काळे यांच्या फिर्यादीवरुन नमूद दोन्ही आरोपींविरुध्द गुन्हा दि. 16.06.2020 रोजी नोंदवला आहे.\

पोलीस ठाणे, नळदुर्ग: सतिश दत्तात्रय पाटील, रा. आरळी (बु.), ता. तुळजापूर हे  दि. 12.06.2020 रोजी दुपारी गावातील आपल्या शेतात होते. यावेळी गावकरी- मल्लीकार्जुन सुतार यांनी मुलगा- विजय, राजकुमार यांच्यासह भाऊबंद- युवराज सुतार, एम्पू सुतार यांच्या मदतीने बेकायदेशीर जमाव जमवून शेतातील रस्त्याच्या कारणावरुन सतिश पाटील यांना लिंबाच्या फोकाने मारहाण केली. यात सतिश पाटील यांच्या नाकाचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या सतिश पाटील यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 17.06.2020 रोजी नोंदवला आहे.


रस्ता अपघात.

पोलीस ठाणे, आनंदनगर: दत्ता शिवाजी जाधव, रा. उंबरे कोठा, उस्मानाबाद व त्यांच्या मुलगा असे दोघे दि. 11.06.2020 रोजी 21.30 वा. सु. मौजे सांजा येथील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 13 एआर 5689 ने प्रवास करत होते. दरम्यान मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 1141 च्या अज्ञात चालकाने मो.सा. निष्काळजीपणे, हयगईने चालवून दत्ता जाधव चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला धडक दिली. या अपघातात दत्ता जाधव व त्यांचा मुलगा हे दोघेही जखमी झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजवीज न करता, अपघाताची खबर पोलीसांना न देता मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 1141 चा अज्ञात चालक घटनास्थळावरुन निघून गेला आहे. अशा मजकुराच्या दत्ता जाधव यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन संबंधीत मो.सा. चालकाविरुध्द गुन्हा दि. 16.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments