Header Ads

पुणे येथून चोरलेल्या 2 मोटारसायकलसह आरोपी उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यात उस्मानाबाद  - पुणे शहरातील पो.ठा. विश्रामबाग गु.र.क्र. 82/2018 भा.दं.वि. कलम- 379 नुसार चोरीस गेलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर प्रो व स्प्लेंडर प्लस अशा दोन मोटारसायकलसह आतिश हनुमंत सगर, वय 19 वर्षे, रा. गावसुद, ता. उस्मानाबाद यास स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 21.06.2020 रोजी ताब्यात घेतले आहे. या बाबतीत पुणे शहर पोलीस उर्वरीत तपास कारवाई करणार असुन आरोपीस सध्या पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) च्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. पांडुरंग माने, आण्णाराव खोडेवाड, सपोफौ- खोत, पोहेकॉ- थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मरलापल्ले यांच्या पथकाने केली आहे.   

अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाई.
पो.ठा. उस्मानाबाद (श.): 1)चिमनाबाई अशोक काळे 2)काऱ्या सायबो काळे, दोघे रा. साठेनगर, उस्मानाबाद 3)शैलेश खळदकर, रा. इंगळे गल्ली, उस्मानाबाद हे तीघे दि. 20.06.2020 रोजी दुध डेअरी पारधी पिढी, साठेनगर, उस्मानाबाद येथे एका पत्रा शेडमध्ये अवैध गावठी दारु तयार करण्याच्या उद्देशाने गावठी दारु तयार करण्याचे साहित्य (गुळ, वजन काटा इत्यादी) एकुण किं.अं. 64,250/-रु. च्या मालासह पो.ठा. उस्मानाबाद (श.) च्या पथकास आढळले. पोलीसांनी घटनास्थळावरील साहित्य जप्त केले आहे.

पो.ठा. वाशी: बाबासाहेब मधुकर गिते, रा. आंद्रुड, ता. भुम हा दि. 20.06.2020 रोजी मौजे ईट ते जातेगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या आशिर्वाद हॉटेल समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने एका पिशवीत देशी दारुच्या 23 बाटल्या (किं.अं. 1,196/-रु.) बाळगला असतांना स्थानिक गुन्हे शाखा च्या पथकास आढळला.

पो.ठा. नळदुर्ग: सुदामती सगर, रा. व्होर्टी, ता. तुळजापूर या दि. 21.06.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 20 ली. गावठी दारु (किं.अं. 1,200/-रु.) बाळगल्या असतांना पो.ठा. नळदुर्ग च्या पथकास आढळल्या.

No comments