Header Ads

आठ वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी अटकेत
 उस्मानाबाद - येरमाळा पो.ठा. गु.र.क्र. 144/2012 या दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- बबन आबा शिंदे, रा. पिंपळगांव (क.), ता. वाशी हा गेली आठ वर्षे पोलीसांना गुंगारा देत असल्याने त्याचा ठावठिकाणा समजून येत नव्हता. स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे त्यास आज दि. 25.06.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी आरोपीस पो.ठा. येरमाळा च्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, कवडे, पोना- समाधान वाघमारे, यांच्या पथकाने केली आहे.


जुगार अड्ड्यावर छापा.”
येरमाळा: लक्ष्मण बाळासाहेब तापडे, रा. गौर, ता. कळंब हा दि. 11.06.2020 रोजी मौजे गौर येथील खंडोबा मंदीर जवळ कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्यासह एक मोबाईल फोन (किं.अं. 4,000/-रु.) व रोख रक्कम 1,910/-रु. असा एकुण 5,910/-रु. च्या मालासह स्थानिक गुन्हे शाखा च्या पथकास आढळुन आला. यावरुन त्याच्याविरुध्द गुन्हा दि. 24.06.2020 रोजी नोंदवला आहे.


अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाया.
येरमाळा: शहाजी बळीराम वाघमारे, रा. वडगांव हा दि. 24.06.2020 रोजी आपल्या राहत्या घरा जवळ दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने एका लबरी ट्युब मध्ये 25 ली. गावठी दारु (किं.अं. 1,500/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. येरमाळा यांच्या पथकास आढळला.


 कळंब: भारत राजेराव पवार उर्फ पिंटु, रा. जुनी दुध डेअरी, कळंब हा दि. 25.06.2020 रोजी आपल्या पत्रा शेड मध्ये अवैध गावठी दारु निर्मीती करत असतांना गावठी दारु निर्मीतीचा एकुण 400 ली. द्रवपदार्थ दोन बॅरल मध्ये बाळगला असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळला. पोलीसांनी गावठी दारु निर्मीतीचा नमूद द्रव पदार्थ घटनास्थळावरच नष्ट केला आहे.

       यावरुन वरील दोघांविरुध्द स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

No comments