Header Ads

सासरच्या त्रासास कंटाळून सुनेची आत्महत्या, 2 गुन्हे दाखल
 शिराढोण: वंदना गोपाळ शिंदे, वय 24 वर्षे, यांनी माहेरहुन पैसे आणावेत याकरीता 1)गोपाळ शहाजी शिंदे (पती) 2)शहाजी शिवाजी शिंदे (सासरा) 3)शोभा शहाजी शिंदे (सासु) सर्व रा. मंगरुळ, ता. कळंब यांनी सन- 2019 मध्ये लग्न झाल्यापासून वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास दिला. त्‍यांच्या या त्रासास कंटाळून दि. 06.06.2020 रोजी 04.45 वा. पुर्वी सुन- वंदना शिंदे यांनी गळफास घेउन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या सिताबाई रघुनाथ वाघमारे (मयताची आई) रा. माळकरंजा, ता. कळंब यांच्या प्रथम खबरेवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 07.06.2020 रोजी नोंदवला आहे.

उस्मानाबाद(ग्रा.): 1)सागर भागवत डुकरे (पती) 2)भागवत सोपान डुकरे (सासरा) 3)सखुबाई भागवत डुकरे (सासु) सर्व रा. सकनेवाडी, ता. उस्मानाबाद यांनी सुन- उमा सागर डुकरे वय 26 वर्षे, यांना दि. 15.05.2018 पासुन किरकोळ कारणावरुन वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास दिला. त्‍यांच्या या त्रासास कंटाळून सुन- उमा सागर डुकरे यांनी दि. 06.06.2020 रोजी 12.00 वा. सु. मौजे सकनेवाडी येथील राहत्या घराच्या छताला (आडुला) गळफास घेउन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मंगल लक्ष्मण शेवाळे (मयताची आई) रा. हिसोली, ता. लातुर यांनी आकस्मात मृत्यु क्र. 28/ 2020 सी.आ.पी.सी. कलम- 174 च्या चौकशीत दिलेल्या जबाबावरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 08.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments