Header Ads

दोन रस्ते अपघात, एक तरुण मयत


पोलीस ठाणे, आनंदनगर: विशाल गजेंद्र रणखांब वय 32 वर्षे, रा. उस्मानाबाद हे दि. 27.05.2020 रोजी 19.14 वा. सु. उस्मानाबाद येथील माणिक चौकातून मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी प्रविण गजेंद्र निंबाळकर रा. आळणी, ता. उस्मानाबाद यांनी मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 2752 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून विशाल रणखांब चालवत असलेल्या मो.सा. ला समोरुन धडक दिली. या अपघातात विशाल रणखांब हे गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले आहेत. अशा मजकुराच्या संतोष राजेंद्र रणखांब (मयताचा भाऊ) यांच्या फिर्यादीवरुन नमुद मो.सा. चालकाविरुध्द गुन्हा दि. 02.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, भूम: तानाजी  अजिनाथ मुंडे रा. हिवर्डा, ता. भूम हे दि. 01.06.2020 रोजी 18.30 वा. सु. त्यांच्या कार क्र. एम.एच. 25 आर 9343 मध्ये बहीण- भाऊजी व भाची यांना घेउन भूम येथे जात होते. दरम्यान भूम येथील युवराज धाब्यासमोर स्कॉर्पिओ वाहन क्र. एम.एच. 23 एआर 1101 च्या अज्ञात चालकाने वाहन निष्काळजीपणे, हयगईने चालवून, चुकीच्या दिशेने येउन तानाजी मुंडे चालवत असलेल्या कारला धडक दिली. या अपघातात तानाजी मुंडे यांचे नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच कारचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या तानाजी मुंडे यांच्या फिर्यादीवरुन नमुद स्कॉर्पिओ च्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दि. 02.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments