Header Ads

अवैधपणे तलवार बाळगुन वाढदिवस साजरा, 2 गुन्हे दाखल कळंब: कळंब शहरात दि. 10.06.2020 रोजी रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक जागी अवैधपणे तलवार बाळगून रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन करुन वाढदिवस साजरा करण्याच्या 2 घटना घडल्या. यात 1)वसीम मुर्तजा शेख, रा. मोमीन गल्ली, कळंब याने  बागवान चौक, कळंब येथे 21.40 वा. वाढदिवस प्रसंगी अवैधपणे तलवार बाळगली. तर दुसऱ्या घटनेत 2) महेबुब मोहंमद शेख, रा. कल्पना नगर, 3)अझर मोमीन यांनी गांधीनगर कळंब येथे 23.30 वा. सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून 4)सर्फराज मोमीन उर्फ शफिक, रा. गांधीनगर याचा वाढदिवस तलवारीने केक कापून साजरा केला.

यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील चौघांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188 सह, भारतीय हत्यार कायदा कलम- 4, 25 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. कळंब येथे दि. 11.06.2020 रोजी नोंदवले आहेत.


पाहिजे (Wanted) आरोपी अटकेत 
पो.ठा. वाशी गु.र.क्र. 73/2011 भा.दं.वि. कलम- 341 या गुन्ह्यात पाहिजे (Wanted) आरोपी- 1)गोपीराज देवेंद्र चव्हाण वय 28 वर्षे, रा. पुणे 2)अंकुश नागनाथ कोकरे वय 28 वर्षे, रा. सोनगिरी, ता. भूम या दोघांना स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 11.06.2020 रोजी दोन ठिकाणांहुन ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी पो.ठा. वाशी च्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, धनंजय कवडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे यांच्या पथकाने केली आहे.

No comments