Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात मारहाणीचे तीन गुन्हे दाखल
कळंब: दादाराव वायसे, रामराव वायसे, उमेश वायसे, महादेव वायसे, रामचंद्र वायसे, शिवम वायसे सर्व रा. आढाळा, ता. कळंब यांनी दि. 24.05.2020 रोजी 20.30 वा. सु. मौजे आढाळा शिवारात शेतबांधाच्या कारणावरुन बेकायदेशीर जमाव जमवून गावातीलच- बजरंग नारायण खारतुडे व त्यांचा मुलगा- सुरेश या दोघांना आडवून शिवीगाळ केली. तसेच दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बजरंग खारतुडे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 03.06.2020 रोजी नोंदवला आहे.


 ढोकी: प्रियंका सचिन मदने रा. तेर, ता. उस्मानाबाद या आपल्या कुटूंबीयांसह दि. 03.06.2020 रोजी 18.30 वा. सु. राहत्या घरी होत्या. यावेळी शेजारील भाऊबंद- सुभाष मदने, अशोक मदने, विलास मदने हे प्रियंका मदने यांच्या घरात घुसून भुखंडाच्या व पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन प्रियंका मदने यांच्यासह पती- सचिन मदने, सासरे- केशव मदने, सासु- शामल व दिर- किरण या सर्वांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या प्रियंका मदने यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 03.06.2020 रोजी नोंदवला आहे.


 मुरुम: सुरज नवनाथ गायकवाड, विजय माटे, अजय गायकवाड सर्व रा. दाळींब, ता. उमरगा यांनी दि. 01.06.2020 रोजी 18.00 वा. सु. पुर्वीच्या भांडणाच्या कारणाचा राग मनात धरुन गावातीलच- निशांत सूरवसे निशांत मधूकर सुरवसे यांच्या राहत्या घरा समोर जाउन त्यांना शिवीगाळ केली. तसेच कुऱ्हाड- काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या निशांत सुरवसे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 04.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments