Header Ads

परंडा : सुनेचा छळ , गुन्हा दाखल परंडा: कुपनलीका खोदण्यासाठी माहेरहुन पैसे आणावेत याकरीता  1)नवनाथ गौतम गटकूळ (पती) 2)इंदुबाई गटकूळ (सासु) 3)कहादेव गटकुळ (दीर) 4)स्वाती गटकुळ (जाऊ) 5)शंकर गटकुळ (चुलतदिर) 6)श्रीराम गटकुळ सर्व रा. खानापुर, ता. परंडा यांनी सुन- सविता हिला सन- 2009 पासून वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास दिला. त्‍यांच्या या त्रासास कंटाळून सुन- सविता या माहेरी खानापूर येथे राहत होत्या. यावर चिडून जाउन रोजी वरील व्यक्तींनी दि. 06.06.2020 सविता यांच्या माहेरी येउन सविता यांच्या आई- वडील व भाऊ यांना दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सविता यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 06.06.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी 
 ढोकी: धनराज थोरात, रा. दाउतपूर, ता. उस्मानाबाद यांनी दि. 06.06.2020 रोजी रात्री 10.30 वा. सु. मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एस 6253 ही  आपल्या घरा समोर लावली होती. सकाळी 05.00 वा. सु. ती मोटारसायकल जागेवर आढळली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 07.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments