Header Ads

22 वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीसह दोघे अटकेतउस्मानाबाद -  पो.ठा. भुम गु.र.क्र. 22/1998 भा.दं.वि. कलम- 353, 341 मधील फरार आरोपी- नेमीनाथ अधिक्या काळे, वय 48 वर्षे, रा. सामनगांव, ता. भुम हा मागील 22 वर्षांपासून पोलीसांना गुंगारा देत होत असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा च्या पथकाने त्यास दि. 07.06.2020 रोजी ताब्यात घेउन भुम पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे. तर, पो.ठा. आनंदनगर गु.र.क्र. 155/2020 भा.दं.वि. कलम- 461, 380 मधील पाहिजे (Wanted) असलेल्या उस्मानाबाद येथील एका अल्पवयीन युवकास (विधी संघर्ष ग्रस्त) स्था.गु.शा. च्या पथकाने ताब्यात घेउन पो.ठा. आनंदनगर यांच्या ताब्यात दिले आहे.

            ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- किसन जगताप, प्रमोद थोरात, बाळासाहेब खोत, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ- अविनाश मरलापल्ले यांच्या पथकाने केली आहे.

No comments