Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल


पोलीस ठाणे, ढोकी: मैनाबाई तात्या काकडे रा. टाकळी (ढोकी) ता. उस्मानाबाद या पती- तात्या काकडे व मुलगा- कृष्णा यांसह दि. 05.06.2020 रोजी 17.30 वा. सु. मौजे टाकळी (ढोकी) येथील आपल्या शेतात होत्या. यावेळी भाऊबंद- भास्कर काकडे, शरद काकडे, चंद्रकांत काकडे, पवन काकडे यांनी मैनाबाई काकडे काम करत असलेल्या ठिकाणी जाउन शेत खरेदीच्या वादावरुन मैनाबाई काकडे यांच्यासह त्यांचा पती व मुलास शिवीगाळ करुन, काठीने- लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या मैनाबाई काकडे  यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 06.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, परंडा: गणेश उमाकांत मोरे रा. हिंगणगांव, ता. परंडा यांनी दि. 07.06.2020 रोजी मौजे हिंगणगांव येथे गावातीलच- अनिरुध्द गोरे यांना काही दिवसांपुर्वी उसने दिलेले पैसे परत मागीतले. यावर चिडून अनिरुध्द गोरे यांच्यासह शेषेराव गोरे, चंद्रकांत गोरे, विठ्ठल गोरे यांनी गणेश मोरे यांना शिवीगाळ करुन, विटा- काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या गणेश मोरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 06.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, आंबी: अनिल नवनाथ ठवरे व अन्य 4 व्यक्ती सर्व रा. कौडगांव, ता. परंडा यांचा  मुंगाव, ता. परंडा येथील अशोक निवृत्ती भांगडे व अन्य 3 व्यक्तींशी दि.06.06.2020 रोजी 08.00 ते 09.00 वा. चे दरम्यान मौजे मुंगाव शिवारात शेतबांधाच्या कारणावरुन वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

No comments