Header Ads

रस्ता अपघात, तरुण मयत


 उस्मानाबाद (श.): सचिन आण्णाराव हासाळे, वय 30 वर्षे, रा. चोराखळी, ता. कळंब हे दि. 19.05.2020 रोजी 20.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक, उस्मानाबाद येथील सुर्या पेट्रोल पंपा समोरील रस्ता ओलांडत होते. 

यावेळी ओमीनी वाहन क्र. एम.एच. 12 एफ यु 3491 चा चालक- महादेव दशरथ शिंदे, रा. चोराखळी याने ओम्‍नी वाहन निष्काळजीपणे, हयगईने चालवून सचिन हासाळे यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात सचिन हासाळे हे गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले आहेत. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजबीज न करता, अपघाताची खबर पोलीसांन न देता नमूद वाहन चालक घटनास्थळावरुन निघून गेला आहे. अशा मजकुराच्या इंदुबाई हासाळे (मयताची आई) यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद वाहन चालकाविरुध्द गुन्हा दि. 25.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments