Header Ads

निष्काळजीपणे मोटारसायकल चालवल्याने पत्नीचा मृत्यू तुळजापूर: संतोष राजु महंकाळे व वैशाली संतोष महंकाळे वय 27 वर्षे, दोघे रा. अणदुर, ता. तुळजापूर हे दोघे पती- पत्नी दि. 02.05.2020 रोजी मोटारसायकलने मंगरुळ पाटी येथील रस्त्याने प्रवास करत होते. यावेळी संतोष महंकाळे यांनी मोटारसायकल निष्काळजीपणे चालवून अचानक ब्रेक दाबल्याने मो.सा. वर पाठीमागे बसलेल्या वैशाली महंकाळे या खाली पडल्या. या अपघातात वैशाली यांच्या डोक्यास मार लागल्याने वैद्यकीय उपचारादरम्यान त्या मयत झाल्या. अशा मजकुराच्या नागेश विठ्ठल घोडके रा. वडरगल्ली, उस्मानाबाद यांच्या फिर्यादीवरुन संतोष महंकाळे यांच्या विरुध्द गुन्हा दि. 04.06.2020 रोजी नोंदवला आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात मारहाणीचे दोन गुन्हे 


ढोकी: उध्दव जिवन गरड रा. जागजी, ता. उस्मानाबाद हे दि. 04.06.2020 रोजी 11.00 वा. सु. मौजे जागजी शिवारातील आपल्या शेतात होते. यावेळी भाऊबंद- शामसुंदर बालाजी गरड, सुधीर गरड, बालाजी गरड या तीघांनी तेथे येउन न्यायालयात चालू असलेली केस मागे घेण्याच्या कारणावरुन उध्दव गरड व त्यांचा भाऊ- अच्युत गरड या दोघांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या उध्दव गरड यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 04.06.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

उस्मानाबाद - चंद्रकांत डोंगरे व त्यांचा पुतण्या- बिभिषण, दोघे रा. सांजा, ता. उस्मानाबाद यांच्या शेतात रवि अनभुले यांनी पत्रे ठेवले होते. ते पत्रे परत नेन्याच्या वादावरुन दि. 04.06.2020 रोजी रवि अनभुले व बाळु अनभुले या दोघा भावांनी चंद्रकांत व बिभिषण या दोघांना शिवीगाळ करुन, लोखंडी सळईने व काठीने मारहाण केली. अशा मजकुराच्या चंद्रकांत डोंगरे यांच्या फिर्यादीवरुन नमुद दोघांविरुध्द गुन्हा दि. 04.06.2020 रोजी नोंदवला आहे.

उस्मानाबादेत चोरी 

उस्मानाबाद -  उस्मानाबाद एम.आय.डी.सी. येथील ‘राजकेम प्रोडक्टस’ या कारखान्याचे शटर अज्ञात चोरट्याने दि. 29.05.2020 रोजी मध्यरात्री उचकटून आतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज या कंपनीची 7.5 अश्व शक्ती क्षमतेची विद्युत मोटार (किं.अं.20,000/-रु.) अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या कारखाना मालक- तानाजी घोगरे रा. आनंदनगर, उस्मानाबाद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 05.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments